नगर शहरात कुठे पडला हुक्का पार्लरवर छापा अहमदनगर प्रतिनिधी : शहरातील गुलमोहर रोडवर पारिजात चौकात कोहिनूर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पत्रा...
नगर शहरात कुठे पडला हुक्का पार्लरवर छापा
अहमदनगर प्रतिनिधी :
शहरातील गुलमोहर रोडवर पारिजात चौकात कोहिनूर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पाच हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे.
शारुख छोटुभाई शेख (रा. भैरवनाथ रेसीडेन्सी, नवनागापूर), सागर चंद्रकांत गायकवाड (रा. बालाजी चेंबर, भिस्तबाग चौक, सावेडी) अशी आरोपींची नावे आहेत. गुलमोहर रोडवर कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधी क्षक अनिल कातकडे यांना मिळाली.
त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता कोहिनूर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हुक्क्यासाठी लागणारे काचेचे भांडे, रबरी पाईप, लाकडी कोळसा असा एकूण ५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास दीपक जाधव करीत आहेत.