निघोजला महावितरणच्या मनमानी विरोधात मंगळवारी रस्ता रोको राष्ट्रवादीच्या सरडे, कवाद, लाळगे, वरखडे यांची आक्रमक भूमिका पारनेर/प्रतिनिधी : वाढ...
निघोजला महावितरणच्या मनमानी विरोधात मंगळवारी रस्ता रोको
राष्ट्रवादीच्या सरडे, कवाद, लाळगे, वरखडे यांची आक्रमक भूमिका
पारनेर/प्रतिनिधी :
वाढीव वीज बिल व महावितरण प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पारनेर तालुक्यात आक्रमक भूमिका घेतली आळकुटी, देवीभोयरे, लोणी मावळा निघोज वडनेर बुद्रुक या भागातील अनेक लोकांचे प्रश्न आहेत. निघोज येथे मंगळवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बस स्टैंड वर रस्ता रोको करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते जितेश सरडे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बोलताना जितेश सरडे म्हणाले की महावितरण प्रशासनाला वारंवार विनंती करूनही तालुक्यात अनेक गावांमधील घरगुती विज ग्राहकांना महावितरणने झटका दिला आहे. शेकडो ग्राहकांना ७० ते ८० हजार रूपयांची बिले पाठविण्यात आली असून ती वसुलीसाठी ग्राहकांच्या पाठीशी तगादा लावण्यात आला आहे.
दरमहा २०० ते ३०० रूपये बिल भरणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांचे जास्त बिले देऊन त्रास दिला जात आहे. दरम्यान, महावितरणच्या या पठाणी वसुलीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वसंत कवाद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जितेश सरडे, मंगेश लाळगे, निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी दिला आहे.
दरम्यान महावितरण कडे राष्ट्रवादीने सर्वसामान्यांच्या हितासाठी काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये वाढीव वीज बिल कमी करायचे असे दाखवायचे व गैरसमज करून ते हप्त्यांनी घ्यायचे हे जमणार नाही. सहा महिन्याच्या सरासरी नुसारच बिल आकारणी करावी.
दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही अजून काहींना मीटर जोडणी दिली नाही त्यांना मीटर जोडणी द्यावी. कमी हॉर्स पावरची मोटार असताना अधिक हॉर्स पॉवर चे बील काही ग्राहकांना देण्यात आले आहेत. कमर्शियलच्या नावाखाली अधिक लाईट बिल आकारण्यात आली आहे ते सुद्धा कमी करण्यात यावे
अनेक ठिकाणी डिपीची अवस्था व पोलची अवस्था अतिशय खराब आहे त्यांची त्वरित दुरुस्ती करावी.
शॉक सर्किटमुळे मागील तीन वर्षांमध्ये बऱ्याच ठिकाणचे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले पण ते नुकसान भरपाई अजून काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही त्याची उत्तरे द्यावी. विजेच्या भारनियमन संदर्भात आठ दिवस आधीच सर्व ग्राहकांना कल्पना देण्यात यावी नंतर अचानक बदल करू नये.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वेळोवेळी दुरुस्तीसाठी खूप मोठा कालावधी जातो त्यांची काय व्यवस्था करणार याची उत्तरे द्यावीत. मागील दोन वर्षांमध्ये मीटर रिडींग घेणारे एजन्सीने कोणत्या मीटरची रीडिंग घेतली याचा अहवाल सादर करावा.
वाढीव बिलाच्या नावाखाली ज्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे ते त्वरित जोडून देण्यात यावे. जे अधिकारी निर्णय घेऊ शकतील यांनी चर्चेसाठी उपस्थित रहावे लेखी उत्तरे आणि मागण्या मान्य होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन सोडणार नाही असा इशारा निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वसंत कवाद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जितेश सरडे, मंगेश लाळगे, निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.