व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून प्रगती करा : आमदार निलेश लंके कर्जुले हर्या येथे साईराज हॉटेलचे उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी : युवकांनी व्यावसायिक द...
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून प्रगती करा : आमदार निलेश लंके
कर्जुले हर्या येथे साईराज हॉटेलचे उद्घाटन
पारनेर/प्रतिनिधी :
युवकांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवसायामध्ये प्रगती साधली पाहिजे. नफा आणि तोटा याचा विचार करत व्यावसायिक करून पुढे जाणे आजच्या काळामध्ये गरजेचे आहे कर्जुले हर्या येथील माजी सरपंच रामदास दाते यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम केले आहे समाजामध्ये काम करत असताना राजकारण समाजकारण करत त्यांनी जनतेची सेवा ही केली आहे.
त्यांचे चिरंजीव युवा सहकारी विकी दाते हे सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत निश्चितच नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल साईराज व्हेज रेस्टॉरंट च्या माध्यमातून ते ग्राहकांना उत्तम सेवा देतील व सामाजिक भान जपत आपल्या व्यवसायाची प्रगती करतील असे मत कर्जुले हरिया येथे साईराज हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील कर्जुले हर्या येथे विकास दाते यांच्या नवीन हॉटेल साईराज प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन सोमवार दि. 23 रोजी संपन्न झाले.
यावेळी जि. प. बांधकाम समिती मा. सभापती काशिनाथ दाते सर, कान्हूर पठार पतसंस्था चेअरमन सुशीलाताई ठुबे, मा. जि. प. सदस्य विश्वनाथ कोरडे, सचिन पाटील वराळ, गुरुदत्त पतसंस्था चेअरमन बा. ठ. झावरे, जोगेश्वरी पतसंस्था चेअरमन जालिंदर वाबळे, मोहनराव रोकडे, हरेश्वर शिक्षण संस्था सचिव शिवाजीराव आंधळे, मा. सरपंच साहेबराव वाफारे, मा. मुख्याध्यापक एकनाथ दाते, निलेश लंके प्रतिष्ठान अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, राजेंद्र चौधरी पिंपळगाव रोठा मा. सरपंच अशोक घुले, मंगेश लाळगे, चंदू ठुबे, भगवान वाळुंज, विनोद औटी, नितीन दांगट, अमोल उगले,
विठ्ठल झावरे, पत्रकार शरद झावरे, शशिकांत आंधळे, गंगाराम उंडे, रवींद्र गायखे, संतोष उंडे, संतोष आंधळे, दत्तात्रय आंधळे, हरीमामा उंडे, गणपतशेठ वाफारे, योगेश पाटील, राहुल आंधळे, सुनील मुळे, वसंतराव आंधळे, बाळशिराम आंधळे, सौरभ बेलकर, साहेबराव चिकणे, शाकीरभाई चौगुले, सचिन वाफारे, पै. दत्तात्रय जगदाळे गणेश शिरतार, दत्तात्रय साळुंके, मनोज झावरे, निलेश भालके, आदी मान्यवर यावेळी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते तसेच कर्जुले हर्या व परिसरातील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.