अमोल उगले वासुंदे गणात राष्ट्रवादीकडून इच्छुक ! आमदार लंके विश्वासू सहकार्याला न्याय देणार का ? पारनेर प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार...
अमोल उगले वासुंदे गणात राष्ट्रवादीकडून इच्छुक !
आमदार लंके विश्वासू सहकार्याला न्याय देणार का ?
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पक्ष संघटनेत सक्रिय असलेले व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व समस्यांवर आपल्या कामाच्या माध्यमातून एक सामाजिक ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले वासुंदे गावचे अमोल उगले हे टाकळी ढोकेश्वर गटात सक्रिय असून युवकांची मोठी फळी त्यांच्या सोबत काम करत आहे. नुकतीच निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण प्रक्रिया जाहीर झाली. वासुंदे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती हे आरक्षण जाहीर झाले असल्याने अमोल उगले यांचे नाव चर्चेत आले आहे. तसेच ढवळपुरी गणातही सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण आल्यामुळे त्या भागातही त्यांच्या असलेले प्राबल्य लक्षात घेता त्या ठिकाणावरूनही उमेदवारी करण्यास ते इच्छुक आहेत.
दरम्यान अमोल उगले यांच्या मातोश्री किसाबाई उगले या वासुंदे ग्रामपंचायत मध्ये सदस्या असून प्रस्थापित झावरे कुटुंबाविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरू आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या अति महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वासुंदे गावात त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व आमदार निलेश लंके यांच्या सहकार्याने अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे अमोल उगले हे गावातील व विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सक्रिय असतात. गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते सामाजिक राजकीय जीवनामध्ये सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून ते पक्षाचे समर्थक आहेत. पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांना ते आपला आदर्श मानतात.
राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांचे सध्याचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जातात. अमोल उगले हे निलेश लंके यांचे एकनिष्ठ सहकारी असल्याने आमदार निलेश लंके हे त्यांच्या अपेक्षांचा विचार करून त्यांना नक्कीच संधी देतील आमदार निलेश लंके यांचे सध्या संपूर्ण तालुक्यात युवा वर्गाला संधी देण्याचे धोरण असल्यामुळे अमोल उगले यांना निश्चित संधी मिळेल असे दिसत आहे.
अमोल उगले सक्रिय असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची मागणी वासुंदे गणातून त्यांचे सहकारी आमदार निलेश लंके यांच्याकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.
अमोल उगले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यास ते वासुंदे गणात नक्कीच किंगमेकर ची भूमिका बजावू शकतात.
अमोल उगले यांचा ढवळपुरी गणातही होऊ शकतो विचार
अमोल उगले हे परिसरात सक्रिय असल्यामुळे ढवळपुरी गणात त्यांचा मोठा मित्रपरिवार असून खडकवाडी, पळशी, वनकुटे, या भागातील आदिवासी युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असल्याने आदिवासी वर्गातूनच खऱ्या अर्थाने त्यांची उमेदवारीची मागणी होत आहे. ढवळपुरी गणातील शिष्टमंडळ उमेदवारीच्या मागणीसाठी आमदार लंकेना लवकरच भेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.