अहमदनगर : येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव "हर घर तिरंगा" या शासनाच्या घोषणेप्रमाणे घरोघरी तिरंगा...
अहमदनगर :
येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव "हर घर तिरंगा" या शासनाच्या घोषणेप्रमाणे घरोघरी तिरंगा फडकवून साजरा करणार आहेत. देशाचा तिरंगा ध्वज हा (ब्रिटिशांवरील) पारतंत्र्यांवर विजय मिळवून अनेक जाती-धर्माच्या क्रांतिकार यांनी महापुरुषांनी आपले बलिदान देऊन मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. परंतु तरीही आज समाजातील काही घटक या स्वातंत्र्या पासून वंचित आहेत. स्वातंत्र्य हे काही मोजक्या लोकांना,धनाढय किंवा वर्षभर देशप्रेम वाऱ्यावर सोडून शासनाचे (सर्व सामान्यांचे )पैसे खाऊन मदमस्त असणाऱ्या ठराविक राजकीय पुढार्या पुरते मर्यादित राहिलेले आहे.
एखादी सर्वसामान्य व्यक्ती ही या वशिलेबाज भ्रष्टाचारी यंत्रणे विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न याच स्वतंत्र काळात केला जातो. तसेच शेतीप्रधान म्हणून घेणाऱ्या या देशात पिकाला हमीभाव न मिळाल्याने व व्यापारी दलालामुळे स्वतःच्या शेतीमध्ये एखाद्या झाडाला दोर बांधून शेतकरी याच स्वतंत्र्याच्या काळात कोणाचेही सरकार येऊ पण आत्महत्या करतो. तसेच एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी रेशन कार्ड, घरकुल, जातीचा दाखला, संजय गांधी. श्रावण बाळ निराधार या मूलभूत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला स्वतंत्र्याच्या 75 वर्षे होऊन देखील 5 ते 10 हजार रुपये लाच द्यावी लागते.
जेव्हा राजकीय नेते शासकीय अभियंते अनेक ठिकाणी सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी शासनाचा पैसा खर्च करून जो रस्ता बनवितात तो केवळ 4 ते 6 महिन्यांमध्ये दुरावस्था होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या सर्वांमध्ये होणारा टक्केवारीचा व्यवहार. गरिबांचे हाल होऊन भ्रष्टाचारयांच्या खिशात पैसा जातोय तर हे स्वातंत्र्य कसे व कोणाचे? शासनाने सर्वसामान्यांचे करोडो रुपये खर्चून बनवलेल्या शासकीय आरोग्य केंद्रावर फक्त कर्मचाऱ्यांचा अभावी त्या इमारतीच्या दारावर एखाद्या महिलेची प्रसूती होत असेल आणि आपल्या सर्वांच्या निष्काळजीपणामुळे त्याच आरोग्य केंद्रावर विक्रीचा फलक लावण्याची वेळ येत असेल,आणि अखेरची घटका मोजत असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणा पाहिल्यावर प्रश्न पडतो की आपण स्वतंत्र आहोत का?
शासनाची "घरकुल"ही संकल्पना सर्वसामान्य निराधार अपंग तसेच भूमिहीन व्यक्तीला, देखील घर मिळावे या शासनाच्या भूमिकेतून करोडो रुपयांचा निधी खर्च करून मांडलेली आहे. परंतु यातील मोठी तफावत म्हणजे केवळ राजकीय पुढार्यांच्या हस्तक्षेपणामुळे वशिलेबाजीमुळे ही योजना सधन कुटुंबांना मिळत असून यापासून सर्वसामान्य कुटुंब वंचित राहत आहे. प्रत्येकाला शासनाच्या वतीने "हर घर तिरंगा" या मोहिमेअंतर्गत भारताचा तिरंगा झेंडा प्रत्येकाच्या घरावर फडकवण्यासाठी देणार आहेत. त्यासाठी शासनाने संपूर्ण भारतभर करोडो रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यात कुठलीही चुकीची बाब मला जाणवत नाही .शेवटी देश हा आपल्या सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ आहेच. या उलट आपण जर शासनामार्फत बेघरांना घरे उपलब्ध करून दिली असती तर या सर्वांनी स्वतःच्या खर्चाने "आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरावर डामाडौलत तिरंगा फडकविला असता" अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केली आहे.
COMMENTS