आमदार नीलेश लंकेंच्या उपस्थितीत उद्या रवींद्र गायखेंचा अभिष्टचिंतन सोहळा अनावश्यक खर्चाला फाटा देत करणार वाढदिवस साजरा पारनेर प्रतिनिधी : त...
आमदार नीलेश लंकेंच्या उपस्थितीत उद्या रवींद्र गायखेंचा अभिष्टचिंतन सोहळा
अनावश्यक खर्चाला फाटा देत करणार वाढदिवस साजरा
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील सावरगाव येथील युवा उद्योजक व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र गायखे यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत दि. ४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरविले आहे.
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी सावरगावातील सर्व वाड्यावत्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप तसेच शालेय साहित्य वाटप व सावरगाव मधीलच गरीब आदिवासी दिन-दलित सर्वसामान्य कुटुंबांसाठी किराणा वाटप इत्यादी उपक्रम ते राबवणार आहेत तसेच गावामध्ये वृक्षारोपण मोहीम घेऊन वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले रवींद्र गायखे हे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न करत असतात. वाढदिवसाचे औचित्य साधात ते असाच उपक्रम राबवणार आहेत.
दरम्यान वाढदिवसानिमित्त दिनांक 4 ऑगस्ट रोजी सावरगाव येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश लंके हे प्रमुख उपस्थित राहणार असून पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबाजी तरटे, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विक्रमराव कळमकर, पारनेर शहराचे नगराध्यक्ष विजय औटी, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्योजक गंगारामशेठ बेलकर, तसेच शिवाजीराव बेलकर तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
रवींद्र गायखे हे सावरगाव येथे होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सत्काराला फाटा देत उपस्थित राहणाऱ्या मित्रपरिवार व मान्यवरांच्या हस्ते ते कोणत्याही प्रकारे बुके शाल श्रीफळ स्वीकारणार नसून शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले आहे.
अशाप्रकारे दातृत्व दाखवत रवींद्र गायखे हे सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करत आहेत.