नेवासे प्रतिनिधी : नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकासमोर असलेल्या एका टायर पंचर दुकानासमोर बुधवारी (दि. ३) रात्री पाऊन...
नेवासे प्रतिनिधी :
नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकासमोर असलेल्या एका टायर पंचर दुकानासमोर बुधवारी (दि. ३) रात्री पाऊनेदहा वाजेच्या सुमारास सराईत तीन दुचाकी चोरट्यांना चांगलाच चोप देत नेवासा नेवासांच्या हव ली करण्याची घटना घडली आहे. याबाबत सराईत तीन चोरट्यांची अजब चोरांची गजब कहाणीमुळे सर्वच उप स्थित जण चांगलेच अवाक झाले. या चोरट्यांच्या दुचाकी चोरी करण्याचा धंदा असा की, मोटारसायकल गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांच्या चाव्या चोरुन घेवून त्याचा वापर इतर गाड्या चोरी करण्यासाठी केला जात असल्याचे समजले.
नेवासा फाटा येथील गर्जे फिटर यांच्या गॅरेजमध्ये या चोरट्यांनी उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाव्या काढून पळालेले सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यामुळे फिटरच्या जागृतपणामुळे या सराईत चोरट्यांना नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात एका टायर पंचर दुकानासमोर पकडले असता युवकांनी या चोरट्यांना चांगलाच चोप देवून घटनेची माहीती नेव सा पोलिसांना दिली असता नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे यांनी पोलिस फौजफाटा घटनास्थळी पाठविला.
यावेळी पोलिस कॉन्स्टेबल राहूल यादव यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले असून आता या चोरट्यांच्या पर्दाफाश नेवासा पोलिस करणार असून या चोरट्यांकडून चोरींच्या गाड्यांचा अधिक तपास लावणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्याचे बोलले जात आहे.