मोठी धक्कादायक बातमी सुपा येथील व्यावसायिकाचा मृत्यू; टेम्पो व मोटरसायकलचा अपघात पारनेर/प्रतिनिधी : अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघाताची मालि...
मोठी धक्कादायक बातमी
सुपा येथील व्यावसायिकाचा मृत्यू; टेम्पो व मोटरसायकलचा अपघात
पारनेर/प्रतिनिधी :
अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी सुपा येथे टेम्पो व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात सुपा येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार यांचा मृत्यू झाला.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक मालवाहतुक टेम्पो हा सुपा नगर रोडवरील दौलत पेट्रोलपंपा समोर रस्ता ओलांडत असतांना त्याच वेळी सुपा येथील संदीप उद्योग समुहाचे सहसर्वे बाळासाहेब पवार हे पवार वाडीकडून हॉटेलवर येत असतांना टेम्पो व मोटारसायकल याची धडक झाली. यात पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तेथील स्थानिक व्यावसायिक व रहिवाश्यांनी ताबडतोब सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती थोडी गंभीर वाटल्याने पवार परिवाराने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.