शिक्षक व सैनिकांबद्दल मला वेगळी व खास आत्मियता : आमदार निलेश लंके सुभेदार विक्रम गुंड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान पारनेर/प्रतिनिधी : श...
शिक्षक व सैनिकांबद्दल मला वेगळी व खास आत्मियता : आमदार निलेश लंके
सुभेदार विक्रम गुंड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान
पारनेर/प्रतिनिधी :
शिक्षक हे पिढ्या घडवण्याचे काम करत असतात तर दुसरीकडे सैनिक हे देशाचे व आपले संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावतात त्यामुळे शिक्षकांबद्दल व सैनिकांबद्दल माझ्या मनात एक वेगळी व खास आत्मियता असल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने भुमीपुत्र सेवानिवृत्त सुभेदार विक्रम आनंदा गुंड यांचा ग्रामस्थांच्या वतीने देशसेवा संपवून सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी उद्योजक कैलास गाडिलकर, उपसरपंच अनिल तरटे, यांच्या सह आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनिल गाडगे, सचिव संदिप तरटे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा.ठ.झावरे, रा.या.औटी ज्येष्ठ नेते भागुजी दादा झावरे, संजय तरटे, गिताराम जगदाळे, फिरोज भाई शेख, दत्तात्रय दिवटे, धोंडीभाऊ गुंड, विकास गुंड, बाळासाहेब गुंड, बाळासाहेब पठारे, दिलीप गुंड, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने शिक्षकांच्या अडचणी काय आहे व शिक्षकांचे या समाजासाठी योगदान काय आहे हे सर्व मला माहीत असून एक आदर्श समाज व पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. तर दुसरीकडे सैनिकांबद्दल मला एक वेगळीच आत्मीयता असून सैनिकांमुळेच आपण सुखाने व शांतीने जगू शकतो. सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे व आपले नागरिकांचे संरक्षण करतात त्यामुळे म्हणे ग्रामस्थांनी त्यांचा जो हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल ग्रामस्थांची खास कौतुकही त्यांनी केले यावेळी गावात विविध प्रलंबित विकास कामे आहेत ती तातडीने लवकर मार्गी लागण्याच्या आश्वासन त्यांनी या कार्यक्रमात दरम्यान दिले आहे.