मंत्री राधाकृष्ण विखेंचा लोणी प्रवरा येथे पारनेर तालुक्याच्या वतीने सन्मान पारनेर प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ...
मंत्री राधाकृष्ण विखेंचा लोणी प्रवरा येथे पारनेर तालुक्याच्या वतीने सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अहमदनगर जिल्ह्याचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. त्यामुळे विखे पाटलांचे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य स्वागत करण्यात येत आहे. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे लोणी प्रवारा या ठिकाणी जाऊन पारनेर तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी स्वागत केले.
यावेळी झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील विकास कामांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केली. तालुक्यातील विविध प्रश्न व समस्या यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केल्यानंतर सुजितराव झावरे पाटील म्हणाले की विखे साहेबांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून तालुक्यात जास्तीत जास्त निधी उपलब्ध होण्यासाठी यापुढील काळात मी पाठपुरावा करणार आहे. व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे.
यावेळी सत्कार प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पारनेर तालुक्याच्या वतीने माझा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी पारनेर करांचे आभार मानतो या पुढील काळात पारनेर तालुक्याच्या विकासासाठी काम करत असताना सुजितराव झावरे पाटील यांना तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी ताकद देणार आहे. विकास कामांसाठी मंत्री पदाच्या माध्यमातून पारनेर तालुक्याला योग्य तो न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच भाजपचे पारनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते हे यावेळी लोणी प्रवारा या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान यावेळी झावरे यांनी विखे पाटलांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.