सुपा एमआयडीसी मध्ये दोन कामगारांचा मृत्यू पारनेर/प्रतिनिधी : सुपा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कामगारांचा मृत्य...
सुपा एमआयडीसी मध्ये दोन कामगारांचा मृत्यू
पारनेर/प्रतिनिधी :
सुपा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कमगाराचा आजारपणामुळे खोलित मृत्यू झाला आहे तर दुसन्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
याबाबत सुपा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ. संपत खैरे व ठाणे अंमलदार पठाण यांनी सांगितले की, पहिली घटना सुपा जुनी औद्योगिक वसाहतीतील स्विफ्ट कंपनीतील कँट्रांकी कामगार तुलाराम विश्वास झारीया (वय ३५) हा कंपनी समोरील चाळीतील खोलितच मृत झाल्याचे शुक्रवारी निदर्शानास आले. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीशकुमार गोकावे, हेकॉ. खैरे, मुसळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. तेथे तो आजारपणामुळे मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर तो रहात असलेल्या ठिकाणी कळले तो व्यसनी होता त्यामुळे त्याच्या अंगावर हाता पायावर जखमा होत्या. सुपा पोलिसांनी त्याची अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दुसऱ्या घाटनेबाबत पोह. ओहळ यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत मयत लालासाहेब तुळशीराम ढेकळे (वय ५४, रा. बेलवडी, जि. सांगली) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे निष्पन्न झाले. सुपा पोलिसांनी दोन्ही घटनांची अकस्मात मृत्युची नोंद केली असुन मृतदेहची उत्तरीय तपासणी पारनेर ग्रामीण रुग्णालयात करून दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.