'हर घर तिरंगा'मध्ये सहभागी व्हावे : सरपंच प्रकाश गाजरे म्हसोबा झाप ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक घरावर फडकवणार तिरंगा ...
'हर घर तिरंगा'मध्ये सहभागी व्हावे : सरपंच प्रकाश गाजरे
म्हसोबा झाप ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक घरावर फडकवणार तिरंगा
पारनेर/प्रतिनिधी :
भारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने 'हर घर तिरंगा' मोहिमेस शासनाने सुरुवात केलेली आहे. देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावायचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. तरी सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपण राष्ट्रध्वज दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्याने फडकवत 'हर घर तिरंगा' मोहीम राबवायची असल्याचे पारनेर तालुक्यातील म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रभक्ती खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी जपली पाहिजे राष्ट्र एकात्मता जपण्यासाठी व स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी शासन हा उपक्रम संपूर्ण भारतभर राबवत आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन राष्ट्रहित व राष्ट्रीय एकात्मता जागृत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी सरपंच प्रकाश गाजरे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून आम्ही स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार आहोत. झेंडा फडकवत असताना प्रत्येकाने ध्वज संहितेचे पालन करणे गरजेचे आहे.
मुख्यत्वे करून तिरंगा झेंडा फडकवताना केशरी रंग हा वरच्या बाजूस असावा आपल्या राष्ट्रध्वजाचे कुठल्याही प्रकारे अवमान अपमान होणार नाही याची प्रत्येक भारतीय म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.