किन्हीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज. मा. खोडदे पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या किन्ही, बहिर...
किन्हीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज. मा. खोडदे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या किन्ही, बहिरोबावाडी गावच्या तंटामुक्त समितीची पुर्नरचना सोमवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली. गावातील छोटे, मोठे तंटे गावपातळीवरच मिटवले जावेत व गावचे सामाजिक वातावरण शांत रहावे या उद्देशाने समितीची पुर्नरचना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख ज. मा. खोडदे यांची तर उपाध्यक्षक्षपदी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी त्रिंबकराव मुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच समितीत सदस्य म्हणुन माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खोडदे, संतोष खोडदे, माजी व्हा. चेअरमन यशवंत व्यवहारे,
सामाजिक कार्यकर्ते बापु व्यवहारे, बाळासाहेब शिंदे, गंगाधर देठे, मारूती सावंत, भाऊसाहेब किनकर, माजी सैनिक पाटिलबा खोडदे, माजी ग्रामपंचायत सदस्या मंदा खरात यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी दिली आहे. या निवडीबद्दल किन्ही ग्रामपंचायच्या सरपंच पुष्पा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे, माजी सरपंच मानसिंग देशमुख, उद्योजक चंद्रकांत खोडदे, प्रा. साजन खोडदे सर, प्रा. सचिन मोढवे सर, माजी सरपंच बाबासाहेब व्यवहारे, आदिनाथ व्यवहारे, छगन भांबरे, भागाशेठ व्यवहारे, बाबाजी व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य संदिप गोरे, जयश्री खोडदे, अश्विनी व्यवहारे, नंदा परांडे, जयश्री व्यवहारे, संतोष खरात, ग्रामसेवक संजय घोलप आदिंनी अभिनंदन केले आहे.
तंटामुक्त समितीमध्ये गावातील सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक, माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला असुन, या समितीमुळे गावातील वाद, विवाद ग्राम स्तरावर मिटवण्यासाठी मदत होणार आहे.
अनिल देठे (शेतकरी नेते)
..