सुजित झावरे यांनी नदीजोड सारखी चांगली संकल्पना राबवली : प्रसाद लाड आमदार प्रसाद लाड यांची सुजित झावरे यांनी घेतली भेट पारनेर/प्रतिनिधी : भा...
सुजित झावरे यांनी नदीजोड सारखी चांगली संकल्पना राबवली : प्रसाद लाड
आमदार प्रसाद लाड यांची सुजित झावरे यांनी घेतली भेट
पारनेर/प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व देवकृपा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांसह नुकतीच सदिच्छा भेट घेतली. विधान परिषद सदस्य झाल्याबद्दल प्रसाद लाड यांचा देवकृपा परिवाराच्या वतीने सुजित झावरे पाटील यांनी सत्कार केला. यावेळी प्रसाद लाड यांनी पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी निधी देणार असल्याचे आश्वासन सुजित झावरे पाटील यांना दिले.
यावेळी लाड यांनी सांगितले की, सुजितराव मा. राज्यपाल यांनी जेव्हा आपला नदीजोड प्रकल्प बाबत सत्कार केला मी तिथेच होतो. आपली नदीजोड प्रकल्पाची माहिती पट मी पाहिला पारनेर तालुका सारख्या दुष्काळी भागात आपण अशी चांगली संकलप्ना राबविले. अशी काही संकलप्ना असल्यास नक्की सांगा मी आपल्याला राज्य सरकार कडून निधी उपलब्ध करुन देण्यास प्रयत्न करील. लवकरच पारनेर तालुका दौरा करणार असल्याचे सांगितले. पारनेर तालुक्यातील नागरिकांनी सत्कार करुन सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले.