म्हसणे सुलतानपूर ग्रामपंचायत मध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण सरपंच डॉ. विलास काळे यांची अनोखी संकल्पना पारनेर/प्रतिनिधी : पारनेर ताल...
म्हसणे सुलतानपूर ग्रामपंचायत मध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
सरपंच डॉ. विलास काळे यांची अनोखी संकल्पना
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर ग्रामपंचायत मध्ये भारताचा ७५ वा स्वतंत्र दिन म्हणजेच अमृत महोत्सवी दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत म्हसणे सुलतानपूर यांनी अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत आपल्या गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
आगळीवेगळी संकल्पना राबवून म्हसणे सुलतानपूर येथील ग्रामपंचायत सरपंच डॉ. विलास काळे यांनी अनोख्या पद्धतीने ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण केले आहे. या त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात येत आहे.
म्हसणे सुलतानपूर ग्रामपंचायत तालुक्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच डॉ. विलास काळे ग्राम स्तरावर नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात. शासकीय योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना त्यांनी गावात एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे सदस्य, ज्येष्ठ ग्रामस्थ गावातील युवक यावेळी उपस्थित होते.