अरुण वाळुंज निर्मित मराठी वेबसिरीज विट्टी दांडूचे उदघाटन पारनेर तालुक्यातील वेब सिरीज महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला पारनेर प्रतिनिधी ...
अरुण वाळुंज निर्मित मराठी वेबसिरीज विट्टी दांडूचे उदघाटन
पारनेर तालुक्यातील वेब सिरीज महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे अन्वीरा एंटरटेंनमेंट निर्मित विट्टी दांडू वेबसिरिजचे उदघाटन गावचे सरपंच गोकुळ वाळुंज, उपसरपंच फैय्याज शेख, सोसायटी चेअरमन सरदार शेख, व्हा. चेअरमन सौ. लतीफा हसनभाई शेख, सोसायटी संस्थापक बाबाजी वाळुंज, माजी सरपंच शिवाजी सागर, मा.सरपंच बादशहाभाई शेख तसेच लोकनेते आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अमोल गवळी, ग्रा. पं. सदस्य सुनील शिंदे, ग्रा.सदस्या,श्रीम. सुमन बबन वाळुंज, ज्येष्ठ कलाकार अर्जुन ठाणगे व लक्ष्मण वाळुंज या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी अरुण वाळुंज यांनी उपस्थित सर्वांना "विटीदांडू"या वेबसिरिजची पार्श्वभूमी सांगून ही वेबसिरीज १५ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्याचबरोबर या वेबसिरीजसाठी दत्तकृपा ग्राफिक्सचे राहुल चव्हाण, मानसी चिटणीस, शभरत नवले, विद्या अरुण, भानुदास शिंदे, सुभाष वाळुंज, एस. पी. क्रिएशनचे एडिटर स्वप्नील वाळुंज, चित्रपट दिग्दर्शक गहिनीनाथ डफळ, वाळुंज मंडप डेकोरेशन चे सर्वेसर्वा नवनाथ वाळुंज, यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे निर्माते अरुण वाळुंज यांनी सांगत त्यांचे ऋण व्यक्त केले.
पिंपळगाव तुर्क'चे लोकनियुक्त सरपंच गोकुळ वाळुंज यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलताना म्हणाले की पिंपळगाव तुर्क सारख्या ग्रामीण भागातून येत अरुण वाळुंज सारखे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कलाक्षेत्रामध्ये उत्तम असे कार्य करत आहे. कलात्मक दृष्ट्या विचार केला तर यापुढील काळात डिजिटल युगाचा अवलंब करत अरुण वाळुंज यांनी पारनेर तालुक्यातील पहिली नवी कोरी अशी वेब सिरीज ती विट्टी दांडू महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. हा खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा व गावचा अभिमान आहे. या पुढील काळात कलाक्षेत्रात काम करत असताना दिग्दर्शक व निर्माता असलेले अरुण वाळुंज यांची निश्चित भरभराट होईल अशी आपण अपेक्षा करूया व त्यांना पुढील कला क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देऊया असे मत सरपंच वाळुंज यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी बाबाजी वाळुंज यांनी ही आपली मनोगते व्यक्त करत वेबसिरीज साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी प्रगतशील शेतकरी चांदभाई शेख,गफूरभाई शेख,सोपान गवळी,शिवाजी वाळुंज,,नजीर शेख, बाळू गवळी,विठ्ठल वाळुंज, ठकाजी ठाणगे, आमिर शेख,संतोष थोरात, आदम शेख,फकरुद्दीन शेख,रियाज शेख,शुभम थोरात,सुरेश वाळुंज, असलम शेख,अजीज शेख,हसन शेख,साहिल शेख,मुजबर शेख, सुशील वाळुंज,राजू थोरात,बशीर शेख,अशपाक शेख,आवडाजी विधाटे त्या त्याचबरोबर गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
अमोल गवळी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उंची अधिकच वाढवली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत विट्टी दांडू खेळत सर्वांनी वेबसिरिज ला पाठिंबा दर्शविला.
उपस्थित सर्वांचे आभार अरुण वाळुंज यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.