म्हसोबा झाप येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती रॅली पारनेर/प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने हर घर तिरंगा या...
म्हसोबा झाप येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती रॅली
पारनेर/प्रतिनिधी :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजरेझाप यांच्यावतीने ग्रामस्थांचे राष्ट्रीय प्रबोधन करण्यासाठी व तिरंग्याचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील घरोघरी जाऊन तिरंग्याचे महत्व तिरंग्याचा सन्मान कसा ठेवावा याविषयी प्रबोधन केले. यावेळी आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
प्रगतशील शेतकरी मार्गदर्शक बाजीराव चि. बेलकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. हर घर तिरंगा जनजागृती फेरीमध्ये शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष लहू बेलकर, पोपट गाजरे, माऊली बेलकर, बाजीराव बेलकर, साहेबराव गाजरे, आकाश बेलकर, आदिनाथ बेलकर, बबन गाजरे, बाळू गाजरे, पोपट बेलकर, बाळू बेलकर, मंगेश आगळे, बाळकृष्ण गाजरे, संतोष बेलकर, राजू बेलकर, सुमन बेलकर, अंजना बेलकर , नंदा बेलकर, ज्योती बेलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक जराड, सहशिक्षक शिरतार, अंगणवाडी सेविका आहेर मॅडम यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाचे आभार कैलास बेलकर यांनी मानले.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हसोबा झाप मध्ये वाडी वस्तीवर जाऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी व आपल्या तिरंग्याचा अभिमान बाळगून अमृतमहोत्सवी वर्ष कशा पद्धतीने साजरे करावे या संदर्भात प्रबोधनात्मक जनजागृती रॅली काढली व ग्रामीण भागातील ग्रामस्थांना प्रोत्साहन देत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे महत्त्व पटवून सांगितले.
प्रकाश गाजरे
( सरपंच, म्हसोबा झाप)
COMMENTS