नाशिक येथील हरीहरवर शिवबाची स्वच्छता मोहिम. किल्ल्यावर नुतुन सदस्य चा शिवबा च्या वतीने सत्कार. पारनेर/प्रतिनिधी : शिवबा दुर्गसंवर्धन परीवार...
नाशिक येथील हरीहरवर शिवबाची स्वच्छता मोहिम.
किल्ल्यावर नुतुन सदस्य चा शिवबा च्या वतीने सत्कार.
पारनेर/प्रतिनिधी :
शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य हि संस्था महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे सवर्धन व स्वच्छता मोहिमांचे नियोजन करत असते. शिवबा संघटना आपल्या सहकार्यांचा सन्मान किल्ल्यावर करत असतो कारण तो सत्कार इतिहासिक असतो. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने शिवबा संघटना सामाजिक कार्य करत आहे. ४ तारखेला हरीहर किल्ला नाशिक येथे स्वच्छता मोहीम पार पडली. या मोहिमेत किल्ल्यावरील प्लास्टीक,बॉटल व इतर कचर्याच्या १२ गोणी कचरा गोळा करून पायथ्याशी आणण्यात आणुन गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवबा संघटनेचे शिरूर तालुकाप्रमुख सोमनाथ भाकरे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. त्या निमित्ताने सरपंच सोमनाथ भाकरे,उपसरपंच आनंदा भाकरे, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे राहुल गारुडकर,डॉ दौलत पांढरकर, यांचा सत्कार सभारंभ हरीहर किल्ल्यावर पार पडला. यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, मोहीम प्रमुख बबन तनपुरे,रोहिदास लामखडे,सुरेश लंके,प्रा. कवडे सर, केशव शिंदे,अरुण लंके,रायचंद गुंड,मेजर अमोल ठुबे,योगेश भाकरे, भिमदास भाकरे, निलेश टिळेकर, राहुल माळवे, बाळासाहेब भंडारी ,संदिप गायकवाड,राजु लंके व शेकडो सहकारी उपस्थित होते.