कारेगाव येथील बन्शी काशिबा घुले यांचे दुःखद निधन; उद्या दशक्रिया विधी पारनेर/प्रतिनिधी : कारेगाव येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व...
कारेगाव येथील बन्शी काशिबा घुले यांचे दुःखद निधन;
उद्या दशक्रिया विधी
पारनेर/प्रतिनिधी :
कारेगाव येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व प्रगतिशील शेतकरी बन्शी काशिबा घुले यांचे सोमवार दि. २९ रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७४ वर्ष होते. त्यांच्या निधनाने घुले कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. बन्शी काशिबा घुले हे कारेगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. गावच्या अध्यात्मिक, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग होता. आपल्या मुलांवर त्यांनी योग्य ते संस्कार केले. शांत व सुस्वभावी असलेले बन्शी घुले हे सर्वांन मध्ये प्रिय असं व्यक्तिमत्व होते. बन्शी काशिबा घुले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम बुधवार दि. ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० कारेगाव येथे दशक्रिया विधी घाटावर होणार आहे. कारेगाव येथील कारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष काशिनाथ घुले यांचे ते वडील होते.