वेब टीम : मुंबई माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांचं कुठेही देणंघेणं झालं नाही. ४० आमदार, १० अपक्ष आमदारांनी एका भावनेपोट...
वेब टीम : मुंबई
माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांचं कुठेही देणंघेणं झालं नाही. ४० आमदार, १० अपक्ष आमदारांनी एका भावनेपोटी, राज्याच्या विकासासाठी एकत्र आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथे पैशांचा कुठेही विषय येत नाही, येणारही नाही.
सर्व आमदार आणि कार्यकर्ते माझ्यासोबत मनापासून आले आहेत. त्यांनी मनापासून हा निर्णय घेतला आहे आणि हा उठाव केला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज विरोधकांकडून टाटा एअरबस प्रकल्पावरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मीसुद्धा याचे उत्तर देईन.
भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध केले नाहीत तर सात ते आठ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत आलेले सर्व आमदार स्वतःहून आले आहेत. त्यांना पैसे देण्याचा विषयच नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.