अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुनानक देवजी यांनी शीख धर्माची स्थापना करुन मानवतेचा संदेश दिला. गुरुनानक यांनी सागितलेल्या नाम जपना, किर...
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुनानक देवजी यांनी शीख धर्माची स्थापना करुन मानवतेचा संदेश दिला. गुरुनानक यांनी सागितलेल्या नाम जपना, किरत करना, वंद छखना या तीन तत्वे समाजाला दिशादर्शक आहे. शीख समाजाचा पाया रचताना त्यांनी उच्च, निच्च भेदभाव न ठेवता माणुसकीची शिकवण जगाला दिली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर या मानवतेच्या भावनेने जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे त्यांनी कौतुक केले.
गुरुद्वारा भाई कुंदनलालजी, गुरुद्वारा बाबा श्रीचंद महाराजजी, घर घर लंगर सेवा व शीख, पंजाबी आणि सिंधी समाज बांधवांच्या वतीने गुरुनानक देवजी यांची 553 वी जयंती म्हणजेच गुरुपुरबनिमित्त तारकपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, अजिंक्य बोरकर, नगरसेवक अमोल गाडे, मनोज मदान, जय रंगलानी, दलजीतसिंह वधवा, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, किशोर कंत्रोड, कैलाश नवलानी, अनिश आहुजा, डॉ. वसंत झेंडे, डॉ. विलास मढीकर, डॉ. नंदकर, करण धुप्पड, राहुल बजाज, कैलाश ललवानी, अशोक सचदेव आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. रक्त कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने मनुष्याला रक्तासाठी मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरत असतो. माणुसकीच्या भावनेने प्रत्येकाने रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी लंगर सेवेच्या सेवादारांनी कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आहे. मानवतेचा संदेश देणारे गुरुनानक देवजी यांची जयंती मानवतेच्या उपक्रमाने साजरी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संध्याकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपिढी व अहमदनगर महानगर पालिका रक्तपिढीचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शोभित खुराणा परिवाराने परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाबरोबरच भाई कुंदनलालजी व बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन-प्रवचन, अखंडपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला.