नगर - सूरत नाशिक अहमदनगर एक्स्प्रेसवे ग्रीनफील्ड महामार्गात मौजे मांजरसुंबा हद्दीतील शेत जमिनी संपादित होण्याची प्रक्रिया सुरू आ...
नगर - सूरत नाशिक अहमदनगर एक्स्प्रेसवे ग्रीनफील्ड महामार्गात मौजे मांजरसुंबा हद्दीतील शेत जमिनी संपादित होण्याची प्रक्रिया सुरू आहे. संपादन होत असताना मौजे मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांवर मोबदला निश्चित होताना जमीन संपादित शेतकऱ्यांवर खालील मुद्यांवर अन्याय होत आहे.मौजे मांजरसुंबा गावाच्या सन 2022-23 चे जमिनीचे शासकीय मूल्यांकन रु. 295000 प्रती हे. इतके कमी आहे. जमीन संपादित करताना उपरोक्त मूल्यांकना नुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला गेल्यास तो अत्यंत तुटपुंजा होईल.
मांजरसुंबा गाव अहमदनगर शहर व औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणारे गाव असल्याने या ठिकाणचे जमिनीचे प्रत्यक्ष मूल्यांकन खूप जास्त आहे. गावात सर्वच शेती बागायत आहे. वरील शासकीय मूल्यांकन दराने जमिनी संपादित झाल्यास जमिनी चे मूल्यांकन अतिशय कमी मिळून तो शेतकऱ्यांवर अन्याय होईल.
तरी सर्व शेतकऱ्यांची आपणास विनंती आहे की, मौजे मांजरसुंबा गावातील शेतकन्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करताना किमान आमच्या शिवा शेजारी असणारे गाव व सूरत नाशिक अहमदनगर एक्स्प्रेसवे ग्रीनफील्ड महामार्गात जमिन संपादित होणाऱ्या आमच्याच तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावातील जमीन मूल्यांकना नुसार मोबदला निश्चित करावा. किमान पिंपळगाव माळवी या शेजारील गावाप्रमाणे मोबदला निश्चित न झाल्यास जमिन बाधित खाली सह्या करणार सर्व शेतकरी मौजे मांजरसुंबा यांचा जमीन संपादित करण्यास संपूर्ण विरोध आहे. तरी मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय दूर होणेबाबत व किमान पिंपळगाव माळवी
गावातील जमीन मूल्यांकना नुसार मोबदला निश्चित होणे गरजेचे आहे तरी अशा आशयाचे निवेदन नगर तालुक्यातील मांजरसुंबा ग्रामस्थांनी खा.डॉ. सुजय विखे यांना दिले.
यावेळी गावचे उपसरपंच जालिंदर कदम, जयराम कदम, भाऊ कदम, पप्पू कदम, अर्जुन कदम, संतोष कदम, आबासाहेब कदम, बाबासाहेब कदम, छगन कदम,बाळासाहेब पटारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी आश्वासन देत सांगितले की तुमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही कायदेशीर बाबी तपासून शेजारील गावाप्रमाणे मूल्यांकन ठरवून रक्कम दिली जाईल.