२६ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान विदर्भ दौऱ्यावर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार बैठका छत्रपती संभाजीनगर : ...
२६ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान विदर्भ दौऱ्यावर
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार बैठका
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभर शिवगर्जना अभियान सुरू झाले आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान या मोहिमेत शिवसेना पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे मार्गदर्शन करतील. यांच्यासमवेत संपर्कप्रमुख किशोर पोतदार, प्रशांत कदम, राजेंद्र गायकवाड, दिलीप जाधव, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावर, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे, शरद कोळी, युवती सेनेच्या दुर्गा शिंदे- भोसले, जिल्हाप्रमुख सुरेश चंदेल, वासुदेव शेडमाके, रियाज खान, संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, संतोष ढवळे, सुधीर कुंवर, युवासेना, महिला पदाधिकारी हे दौऱ्यात सहभागी होणार आहे.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे रविवार, २६ रोजी दुपारी १ वाजता कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे शिवसैनकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन, त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे शिवसेना पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतील.
सोमवार २७ रोजी दुपारी १२:३० वाजता चामुर्शी येथे शिवसैनिक मेळावा व मार्गदर्शन, चामुर्शीहुन चंद्रपरकडे रवाना, सायंकाळी एसटी वर्कशॉप चंद्रपूर येथे शिवसैनिक मेळाव्यास मार्गदर्शन करतील.
मंगळवार, २८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सकाळी ११:३० वाजता राजुरा येथे शिवसैनिक मेळाव्यात मार्गदर्शन, त्यानंतर ४ वाजता भद्रावती, वरोरा येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतील.
बुधवार, १ मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सकाळी ११ वाजता शिवसेना पदाधिकारी मेळाव्यास मार्गदर्शन, वणीवरून यवतमाळकडे प्रयाण. ४ वाजता यवतमाळ येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतील.
गुरुवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजता दारव्हा,जिल्हा यवतमाळ येथे शिवसैनिक पदाधिकारी मेळावा व मार्गदर्शन, दारव्हाहुन उमरेड कडे प्रयाण, ४ वाजता उमरेड येथे मेळावा व मार्गदर्शन, सायंकाळी ७:३० वाजता वाशिम येथे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक.
शुक्रवार, ३ मार्च रोजी वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे सकाळी ११ वाजता मेळावा व मार्गदर्शन, त्यानंतर दुपारी २ वाजता वाशीम येथे मेळाव्यास मार्गदर्शन, वाशीमवरून रिसोड
कडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता शिवसेना पदाधिकारी मेळाव्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे मुख्य मार्गदर्शन करतील.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व अंगीकृत संघटना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.