अहमदनगर, दि.9 (जिमाका वृत्तसेवा) – बुरूडगाव रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान राष्ट्री...
अहमदनगर, दि.9 (जिमाका वृत्तसेवा) – बुरूडगाव रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ तरूणांनी घ्यावा. असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य के. ए. जहागीरदार व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार व्ही. एम. प्रभुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
केंद्र सरकारच्या प्रशिक्षण महानिदेशालय यांच्या सूचनेनुसार जिल्हयातील रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या आयटीआय, एमसीव्हीसी, एमएसबीव्हीई प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार तसेच एसएससी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे.
पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून तेथे आपणांस उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे अथवा क्यूआर कोडद्वारे आपली नोंदणी करावी. दहावी उत्तीर्ण गुणपत्रक, आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड इत्यादी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतिंसह या भरती मेळाव्यास उपस्थित राहावे. असे आवाहन श्री.जहागीरदार व श्री.प्रभुणे यांनी केले आहे.