वेब टीम : मुंबई पक्षाचे नाव 'शिवसेना' आणि पक्षाचे चिन्ह 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदे गटाकडेच राहणार असल्याची मोठी घोषणा निवडणूक आ...
वेब टीम : मुंबई
पक्षाचे नाव 'शिवसेना' आणि पक्षाचे चिन्ह 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदे गटाकडेच राहणार असल्याची मोठी घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. तसेच आज सकाळी अकराच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून, त्यात काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय समर्थनीय नाही, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत पक्षाचे खरे नाव कोण ठेवायचे हे ठरवणे समर्थनीय नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारची ही पूर्ण गुंडगिरी आहे, जी लोकशाहीसाठी घातक आहे.
'आमचा लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे योग्य नाही', असे उद्धव म्हणाले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह चोरले आहे.
या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे उद्धव म्हणाले, निकाल आमच्या बाजूने येईल, अशी अपेक्षा आहे.
रामाकडेही धनुष्य बाण होते आणि रावणालाही, पण रामाचा विजय झाला होता, असे उद्धव म्हणाले. शिंदे गटाचे लोक आधीच आपल्या बाजूने निर्णय घेणार असल्याचे सांगत होते, त्यामुळे नेमके काय चालले आहे, हे स्पष्टपणे समजू शकते, असे उद्धव म्हणाले.
लोकशाहीची ही गळचेपी अत्यंत घातक आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून शेवटपर्यंत लढणार असल्याचे उद्धव म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ, सर्वोच्च न्यायालय हा आदेश रद्द करेल, अशी खात्री असल्याचे उद्धव म्हणाले. 16 आमदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवणार आहे. ही चोरी त्यांना पचनी पडणार नाही, जनता त्याला उत्तर देईल, असे उद्धव म्हणाले.


COMMENTS