नगर - येथील फौजदारी वकिल अॅड.सतिशचंद्र सुद्रिक यांचे शिरुर, जि.पुणे येथील न्यायालयाच्या वकिल संघटनेच्यावतीने ‘सत्र न्यायालयाती...
नगर - येथील फौजदारी वकिल अॅड.सतिशचंद्र सुद्रिक यांचे शिरुर, जि.पुणे येथील न्यायालयाच्या वकिल संघटनेच्यावतीने ‘सत्र न्यायालयातील फौजदारी कामकाज’ या विषचयावर वकिलांसाठी व्याख्यान सोमवार दि. 19 जून 2023 रोजी दुपारी 2 वा. आयोजित केले आहे.
अॅड.सुद्रिक यांनी जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत हजारो खटले चालवले आहेत. राज्यात गाजलेल्या 1990 मधील पानसवाडी खून खटला, ज्यामध्ये एका आमदारासह 27 आरोपी होते. सोलापूर येथे 1991 मध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडात त्यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले. त्यामध्ये आरोपीस फाशीचा शिक्षा ठोठावण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता शाहरुख खान यांच्यावतीने त्यांनी त्यांचे वकिल म्हणून काम पाहिले आहे. राज्य शासनाने जिल्हा सत्र न्यायालयात तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयातही त्यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली होती. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहारात आधारकार्ड सक्तीचे करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेतील सर्व मुद्यांची अंमलबजावणी राज्य सरकारने स्वीकारली आहे.
तसेच 2018 मध्ये लोक न्यायालय हा लघुपट तयार केला. त्याची तात्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांनी प्रशंसा केली. यापूर्वीही नाशिक वकिल संघ, पिंपळगांव बसवंत वकिल संघ, बार्शी (सोलापूर) वकिल संघ, कर्जत, श्रीरामपूर वकिल संघ, नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी देखील याच विषयावर व्याख्याने आयोजित केली होती.