वेब टीम : नागपूर राज्यातील सरकार कधीही कोसळेल असं मध्यंतरी आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्याच म्हणण्याला एकप्रकारे दुजोरा देण्याचं काम शि...
वेब टीम : नागपूर
राज्यातील सरकार कधीही कोसळेल असं मध्यंतरी आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्याच म्हणण्याला एकप्रकारे दुजोरा देण्याचं काम शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल. सरकारमध्ये तीन इंजिन आहेत. त्यामुळे सरकार मजबूतही होऊ शकते आणि बिघाडही होऊ शकतो.” असं ते म्हणालेत.
माजी मंत्री बच्चू कडू सध्या नागपूरच्या दौऱ्यावर असून नागपुरात बच्चू कडू यांनी प्रसारमाधम्यांशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी विविध मुद्दयावर मोठे भाष्य केले. बच्चू कडू म्हणाले, 'मुंबईत राहीले म्हणजे मंत्रिपद मिळते आणि गावी राहीले म्हणजे मिळत नाही, असे काही नाही. मंत्री नसलो तरी काम करावे लागते'. कामासाठीच मी परत आलो.
अजित पवारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. अजित पवार गटाच्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या कार्यशैलीला नाराज होऊन शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते, त्यातच बच्चू कडू यांचाही समावेश होता.
बच्चू कडू यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारसह अजित पवार अर्थमंत्री हवे की नको याबाबत संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत.
खातेवाटपाबद्दल बच्चू कडू म्हणाले की, कामासाठीच मी परत आलो. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल. सरकारमध्ये तीन इंजिन आहेत. त्यामुळे सरकार मजबूतही होऊ शकते आणि बिघाडही होऊ शकतो.”
बिघाडा होऊ नये म्हणूनच बैठका सुरू आहे. कुणाला कोणते खाते द्यायचे, कोणता जिल्हा द्यायचा असे प्रश्न आहेत. दिसायला सोपे आहे. पण आतून पोखरलेले असू शकते'.
यावेळी, त्यांना कोणत्या पदाची अपेक्षा आहे असे विचारले असता ते म्हणाले, 'मला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही फोन नाही. आमदारांची नाराजी होणारेच शेवटी पद आहे. सगळीकडे आनंद नाही, विरोधी पक्षातही नाही.
सत्ताधारी पक्षातही नाही. अर्थखाते अजितदादांकडे जाऊ नये, अशी अनेक आमदारांची मागणी आहे. अजित पवारांना अर्थखाते देण्यालाही काहींचा विरोध आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करणे मोठे आव्हान असेल. कारण त्यातून नाराजीचा सूर उमटेल, असेही बच्चू कडू पुढे म्हणाले.
'बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदे गेली आहेत. प्रत्येकाला असं वाटते की आपल्या हातातला घास खाणारा राष्ट्रवादी पक्ष येथेही आला आहे. त्यामुळे ही नाराजी असणार आहे, असेही कडू पुढे म्हणाले.